ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शाखेमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

ग्रंथालय आणि माहिती विज्ञान शाखेतील सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची तिसरी तुकडी कोविड १९ महामारीमुळे घेता आली नव्हती. आता ही तुकडी दि. १५ मार्च २०२१ पासून गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्मागुडी, फोंडा गोवा येथील वर्गांमध्ये कोविड १९ चा फैलाव रोखण्यासाठीच्या सर्व मानक कार्य प्रणालीचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात येईल. हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा असून त्यामध्ये प्रतिष्ठित ग्रंथालयामधील ४५ दिवसांच्या इंटर्नशिपचा समावेश असेल.

शालेय ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये (ग्रेड I आणि ग्रेड II ग्रंथपाल) आणि इतर शैक्षणिक/ व्यावसायिक ग्रंथालयांमध्ये सहाय्यक ग्रंथपाल पदावर काम करू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम सक्तीचा असतो. या तुकडीमध्ये केवळ ३० जागा उपलब्ध असल्याने प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल. आधीपासूनच ग्रंथालयांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार असून यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेत १२वी उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांना १ मार्च २०२१ पासून महाविद्यालयाच्या कार्यालयातून प्रॉस्पेक्टस घेता येईल. अधिक माहितीसाठी अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संदेश बी. देसाई यांच्याशी 9823978438/083223363891/392/393 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२६

Skip to content